या मैत्रिणीसाठी अभिनेता स्वप्निलची खास पोस्ट, म्हणतो "ती नेहमी माझ्याबरोबर प्रवाहात उभी असते"

By  
on  

अनेकांच्या आयुष्यात खास मित्र-मैत्रिणी असतात ते कायम साथ देत असतात.  अभिनेत्री स्वप्निल जोशीने त्याच्या अशाच एका खास मैत्रिणी विषयी सांगण्यासाठी नवरात्रीचा दिवस शोधलाय.. स्वप्निल त्याच्या आयुष्यातील महिलांचा सन्मान म्हणून नवरात्रीत दररोज एक पोस्ट करतो. त्याची आई, पत्नि, मुलगी यांच्यासह त्याची खास मैत्रिण समिधा गुरुविषयीही त्याने खास पोस्ट केली आहे.

'गेट वेल सून' या नाटकात स्वप्निल आणि समिधाने एकत्र काम केलं होतं. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. ती मैत्री आजही घट्ट टिकून आहे. याच मैत्री आणि मैत्रिणीविषयी स्वप्निल या पोस्टमध्ये लिहीतो. 

स्वप्निल लिहीतो की, "असं म्हणतात की एन्टरटेन्मेंट फिल्डमध्ये बहुतेक वेळा, नाती यश आणि अपयश शी जोडलेले असतात. पण, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातंच! मी खुप भाग्यवान आहे कारण खूप चांगले मित्र-मैत्रिणी माझ्या वाट्याला आले. त्यांच्यापैकी एक नाव मला आवर्जून घ्यावंसं वाटतं ते समिधाचं!  गेट वेल सून नाटकाच्या निमित्ताने आमची दोस्ती झाली ती आजतागायत. ती माझी कट्टर समर्थक आहे. जीवाला जीव देणारी आहे. तुमच्या आनंदात अनेक लोकं तुमच्या बरोबर उभे राहतात. पण तुमच्या दुःखात, पराभवात तुमच्याबरोबर खंबीरपणे जे उभे राहतात त्यांची नेहमी आठवण काढावी. वारा तुमच्या बाजूनी वाहो, विरुद्ध वाहो... समिधा नेहमी तुमच्या बरोबर प्रवाहात उभी असते. मला वाटतं ती एक उत्तम अभिनेत्री आहेच पण माझ्यासाठी ती एक अत्यंत उत्तम मैत्रिण आहे. मी जसा आहे तसा मला स्वीकारणारी. अशी एक व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात हवीच जे तुमचं आयुष्य चांगल, स्वस्थ बनवतात. समिधा.. धन्यवाद एक खूप खूप चांगली आणि प्रामाणीक मैत्रीण असण्यासाठी."  

ही खास पोस्ट करून स्वप्निलने समिधाचे आभार मानले आहेत.

Recommended

Loading...
Share