By  
on  

'सुखी माणसाचा सदरा' मालिकेतून केदार शिंदे करणार हा प्रयत्न

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांची सुखी माणसाचा सदरा ही येत्या 25 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे टिझरही प्रदर्शित झाले आणि आता या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. या मालिकेच्या निमित्ताने केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी पुन्हा एकदा नव्याने सोबत काम करतेय. 

या मालिकेच्या निमित्ताने केदार आणि भरत दोघही सोशल मिडीयावर विविध पोस्ट करत आहेत. त्यातून या मालिकेत काय पाहायला मिळणार याची प्रचिती येत आहे. प्रेक्षकांना आपलेपण वाटणारी ही मालिका असेल हे यातून स्पष्ट होतय. मात्र केदार शिंदे यांनी सोशल मिडीयावर आणखी एक पोस्ट केली आहे. यात ते प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा उल्लेख करतात. ते लिहीतात की, "आपल्या जीवनात जे जे घडतं.. ते ते व्यंगचित्र रूपाने रोज सकाळी दाखवण्याचं अलौकिक काम करणारे.. आर. के. लक्ष्मण.. आपल्याला आरसा त्यांनी दाखवला. तोच प्रयत्न #25october पासून रोज रात्री ९.३०वा."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आपल्या जीवनात जे जे घडतं.. ते ते व्यंगचित्र रूपाने रोज सकाळी दाखवण्याचं अलौकिक काम करणारे.. R.K.Laxman.. आपल्याला आरसा त्यांनी दाखवला. तोच प्रयत्न #25october पासून रोज रात्री ९.३०वा.. #sukhimanasachasadara #colorsmarathi @sukhi.manasacha.sadaraofficial @rohinihattangady @saneness_ @colorsmarathiofficial @bharatjadhav344 @siddharth23oct @ameydhamanaskar @omkar_mangesh @vishe_tanishkaashok @shreyas_t_04 @shruja_prabhudesai

A post shared by Kedaar Yeshodhara Shinde (@kedaarshinde) on

 

तेव्हा लोकांच्या जीवनात जे जे घडतं ते व्यंगचित्राच्या माध्यमातून आर. के. लक्ष्मण दाखवत असे. मात्र या मालिकेतही तसाच प्रयत्न केला असल्याचं केदार शिंदे या पोस्टमध्ये सांगतात. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive