By  
on  

'रंग माझा वेगळा' मालिकेत आता या जोडीचं होणार लग्न, लग्नासाठी खास नटले कलाकार

'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. एकीकडे कार्तिक आणि दीपाला सौंदर्या इनामदारचं काळ्या रंगाविषयी द्वेषाबद्दलचं रहस्य कळालेलं आहे. मात्र यातच कार्तिकला अपघात होतो आणि त्याची जुनी मैत्री तनुजा पुन्हा त्याच्या आयुष्यात येते. अभिनेत्री अभिज्ञा भावे या मालिकेत तनुजाची भूमिका साकारत आहे.

यातच दीपाच्या आईविषयी ही सौंदर्याला कळतं आणि सौंदर्याचा दीपाविषयीचा द्वेष अधिक वाढतो. मात्र सगळ्यात दीपा आता कोणतं पाऊल उचलतेय हे पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.मात्र आता दीपाला कार्तिकच्या आयुष्यातून काढण्यासाठी आता सौंदर्या श्वेता आणि आदित्यचं लग्न लावणार आहे. या लग्नात तनुजा, दीपा आणि कार्तिक नटून थटून तयार आहेत. तेव्हा मालिकेत आता या लग्नात काय नवीन पाहायला मिळेल याचीच उत्सुकता आहे. 

कार्तिकची जुनी मैत्रीण तनुजाची अचानक एन्ट्री झाल्याने आता यात तनुजा आणि कार्तिकची जवळीक वाढताना दिसेल का हा प्रश्न प्रेक्षकांना सध्या पडला असेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive