By  
on  

पाहा Video : या प्रसिद्ध गाण्यावर पूजा सावंतने केला व्हिडीओ

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक अभिनेत्रींनी दररोज त्या त्या दिवसांच्या रंगाचे पेहराव केले आहेत. या अभिनेत्री सोशल मिडीयावर नऊ दिवस त्यांच्या सुंदर लुकमधील फोटो पोस्ट करत आहेत. अभिनेत्री पूजा सावंतही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध फोटो पोस्ट करताना दिसतेय. पूजाने नुकतेच पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंसोबतच पूजाने एक खास व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. 'निळकंठ मास्तर' या पूजाच्या सिनेमातील 'अधीर मन झाले' या प्रसिद्ध गाण्यावर पूजाचा हा व्हिडीओ आहे. पिवळ्या रंगाच्या साडीत पूजाच्या सुंदर अदा या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

 

या गाण्यावर पूजाने अनेकदा परफॉर्मही केलेलं आहे. पूजाचं हे गाणं चांगलच लोकप्रिय आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive