By  
on  

आसावरी फेम निवेदिता सराफ यांचा नवरात्र विशेष उपवासाचा खास बेत

नवरात्रीच्या निमित्ताने अनेक जण उपवासही करतात. मग यासाठी घरात खास उपवासाचे पदार्थ बनवले जातात. अभिनेत्री निवदिता सराफ यांच्या घरीही असा बेत आहे. अग्गंबाई सासूबाई मालिकेत आसावरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निवेदिता सराफ यांना कुकिंगची प्रचंड आवड आहे. त्यांचं युट्यूबवरही खास कुकिंगचं रेसिपीज चॅनेल देखील आहे. सोशल मिडीयावर तर निवेदिता या विविध छान रेसिपीचे व्हिडीओ पोस्ट करतात.

नुकताच निवेदिता सराफ यांनी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी खास नवरात्र विशेष उपवासाचा बेत केलेला पाहायला मिळतोय. त्या लिहीतात की, "खास नवरात्र विशेष उपासाचा बेत
दाण्याची आमटी, वरीचा भात, कच्च्या केळ्याचे वडे."

नवरात्रोत्सवाच्या उपवासासाठी निवदिते यांनी तर खास बेत केलेला दिसतोय. आणि त्याची रेसिपीही त्यांनी चाहत्यांसाठी त्यांच्या चॅनेलवर पोस्ट केली आहे. 

 

निवेदिता आणि अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफलाही कुकिंगची आवड आहे.   

Author

Recommended

PeepingMoon Exclusive