जिजाचा हटके स्वॅग, म्हणते "पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल"

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत आता जिजाचा स्वॅग पाहायला मिळतो. अभिनेत्री अक्षया देवधर या मालिकेत अंजली बाईंच्या भूमिकेत दिसली होती. इतकी वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर आता अक्षया जिजाच्या रुपात दिसत आहे. बोलायला फडगळ आणि बिनधास्त अशी ही जिजा आहे. जिजाला पहिल्यांचा पाहुनच राणादा थक्क झाला होता.

आता सध्या जिजाचा लय भारी स्वॅग लक्ष वेधतोय. अक्षया ही सोशल मिडीयावर सक्रिय असते. नुकताच तिने जिजाचे काही सेटवरील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये अक्षया लिहीते की, "तुमचा पॅटर्न कोणताही असो, जिजाचा नाद केला तर पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल."

 

आता असं म्हटल्यावर जिजाचा नाद कुणी कसा काय करेल ? आणि म्हणूनच जिजाच्या नादाला कुणीच लागत नाही. मात्र हा स्वॅग राणादावर कसा भारी पडतोय हे पाहणं रंजक ठरतय. या मालिकेला आणखी काय आणि कसं वळण मिळतय हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

Recommended

Loading...
Share