पाहा Video : सिद्धार्थ जाधव असा झाला सिमेंटशेटच्या रुपात तयार

By  
on  

याच वर्षी आलेल्या 'धुरळा' या सिनेमाने या सिनेमाने चांगलाच राडा केला होता. नुकताच या सिनेमाचा टेलिव्हीजन प्रिमियरही झाला. या सिनेमातील प्रत्येक पात्र हे हटके असून लक्षवेधी ठरत. यातच अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या सिमेंटशेट या भूमिकेने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. या भूमिकेत सिद्धार्थचा वेगळा लुकही पाहायला मिळाला होता. 

सिद्धार्ध जाधवने नुकतच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत सिद्धार्थने सिमेंटशेट भूमिकेसाठी तयार होतानाचा मेकिंग व्हिडीओ शेयर केला आहे. यात सिद्धार्थचा हा लुक कसा तयार झाला हे पाहायला मिळतय.

 

'धुरळा' या सिनेमात सिद्धार्थ जाधवसह अभिनेता अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमेय वाघ, अलका कुबल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

Recommended

Loading...
Share