'फर्जंद' सारख्या ऐतिहासिक सिनेमांचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता बॉलिवुड डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' यांसारखे दर्जेदार मराठी सिनेमे त्यांनी दिलेत. मात्र आता दिगपाल यांच्या दिग्दर्शनाची कमाल बॉलिवुडमध्ये पाहायला मिळणार असल्याचं बोललं जातय.
'अश्वमेधाम' फेम तेलुगू अभिनेता ध्रुवा करुणाकरसोबत दिगपाल सिनेमा करत आहे. मात्र याविषयीची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रसिद्ध वृत्तपत्र आणि वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत दिगपालने या बातमीला दुजोरा दिला आहे. एका मोठ्या प्रोजेक्टसाठी दोघं काम करत असल्याचं त्याने सांगितलय. मात्र हा सिनेमा बॉलिवुड डेब्यू असेल की नाही हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
एवढच नाही तर दिगपालने सोशल मिडीयावर ध्रुवासोबतचा सेल्फिदेखील शेयर केला आहे. या पोस्टमध्ये दिगपाल लिहीतो की, "काहीतरी नवीन, काहीतरी नव्याने."
तेव्हा मराठीत ऐतिहासिक सिनेमांसाठी लोकप्रिय असलेला दिग्दर्शक दिगपाल याता या सिनेमातून काय नवं घेऊन येतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. याशिवाय 'जंगजौहर' हा मराठी सिनेमादेखील दिगपाल प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.