By  
on  

'कोण होणार करोडपती'ची धुरा नागराज मंजुळेंकडे,लवकरच पाहा सोनी मराठीवर

आपल्या सिनेमांमधून एक वेगळीच छाप पाडणारे सृजनशील दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहेत. सामान्याचं करोडपती होण्याचं स्वप्नं पूर्ण करणा-या कोण होणार करोडपती या कार्यक्रमाची धुरा आता नागराज मंजुळेकडे आहे. हिंदी कौन बनेगा करोडपतीची सूत्रं जशी महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे आहेत तशी आता मराठी कोण होणार करोडपतीची सूत्र नागराज मंजुळे सांभाळणार आहेत. लवकरच हा कार्यक्रम सोनी मराठीवर पाहता येणार आहे.

https://twitter.com/sonymarathitv/status/1101762675984486400

 

नवीन पर्वाची घोषणा झाल्यापासूनच सूत्रसंचालक कोण असणार याची उत्सुकता होती. आता नागराज मंजुळेंचं नाव समोर येताच या पर्वाची उत्सुकता आणखीनच वाढलीय. सैराटमधून याड लावणा-या नागराज मंजुळे यांची  ही नवी इनिंग पाहम्याची सा-यांनाच आतुरता लागून राहिली ाहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive