By  
on  

शनाया फेम रसिका सुनीलने नव्या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच केली ही गोष्ट, पाहा व्हिडीओ

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलला अभिनयासोबतच गायनाची देखील आवड आहे. रसिकाने गायनाचं शिक्षणही घेतलेलं आहे. शिवाय तिने काही गाणीदेखील गायली आहेत. असचं एक गाणं रसिका येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

"तुम बिन मोहे" असं या गाण्याचं नाव आहे. रसिकाने स्वत: या गाण्याला आवाज दिला असून तिनेच या गाण्याच्या व्हिडीओचं दिग्दर्शन केलेलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने रसिकाने पहिल्यांदाच असा व्हिडीओ दिग्दर्शित केलेला आहे. लॉस एंजेलिसमध्ये या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Please do share using the hastag- #tumbinmohe Starring- Rasika Sunil, Aamir Merani Directed by- Rasika Sunil Music Composed and Produced by- Ashutosh Sohoni @ashutosh_sohoni Lyrics- Sayli Pande @saylipande Vocals by- Rasika Sunil Director of Photography- Anup Kulkarni @anupk15 Edited by- Mayur Hardas @mayurhardas Colorist- Anup Kulkarni Song Mixed by- Dario Forzato @darioforzatomusic Sitar by- Rahul Neuman @rahulneuman Los Angeles Recording studio courtesy- Keith Kohn @feed.your.soul.music Music Supervisor- Rohan Pillai @rohantpillai, Mugdha Inamdar @mugdha12 English Adaptation of the song by- Shweta Chandole @theskygazingsoul Costumes by- Reema sharma @reemasharma.1 Makeup Artist- Sania Malik @saniakmalik Production Crew- Bilqees Zalmai @itsbil_keyz Gautam Shirodkar @gautamms Anvi Shah @globecatcher Florence De Smet @florencedesmet_ Shweta Barde @shwetabarde Posters and Album Art designed by- Aditi Deshpande @divinesukh, Varad Godbole @godbolevarad at @cerebrum.design Teaser Edited by- Shubhendu Lalit @shoobhendoo

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

 

नुकतच सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन रसिकाने या गाण्याविषयीची माहिती चाहत्यांना दिली. शिवाय नुकतच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. येत्या 15 नोव्हेंबर रोजी रसिकाचं हे नवं गाणं प्रदर्शित होणार आहे. एवढच नाही तर रसिकाने तिचं युट्यूब चॅनेलही सुरु केलेलं आहे. या गाण्यानेच तिच्या या नव्या चॅनेलची सुरुवात झाली आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive