तरुणाईला आपल्या सुमधूर आवाजांनी भुरळ पाडणारे दोन युथफुल गायक म्हणजेच केतकी माटेगावकर आणि राहुल वैद्य हे एकमेकांना साथ दे तु मला असं म्हणतायत. तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल, असं का म्हणून. पण त्याचं झालंय असं,स्टार प्रवाह वाहिनीवर ११ मार्चपासून सुरु होणाऱ्या ‘साथ दे तू मला’ या मालिकेचं शीर्षकगीत राहुल आणि केतकीच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलंय. गीतकार श्रीपाद जोशीच्या ह्या गीताला संगीतकार निलेश मोहरीरने संगीत दिलं आहे.
या टायटल ट्रॅकविषयी सांगताना केतकी म्हणाली, ‘साथ दे तू मला मालिकेच्या निमित्ताने खूप सुंदर टायटल ट्रॅक गाण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. राहुल वैद्यसोबत हे गाणं गाताना खुपच मजा आली. गाण्याचे शब्द खूप सुंदर आहेत आणि निलेश मोहरीर यांनी अप्रतिम म्युझिक दिलं आहे. हे टायटल ट्रॅक ऐकल्यानंतर ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होत रहाते. माझ्या आजवरच्या गाण्यांपैकी हे खुपच स्पेशल गाणं आहे. प्रेक्षकांच्या मनावर हे गाणं नक्कीच रुंजी घालेल याची मला खात्री आहे.’ अशी भावना केतकी माटेगावकरने व्यक्त केली.
राहुल वैद्य या गाण्याविषयी म्हणाला, एखादी चाल जशी मनात घर करुन जाते तसंच काहीसं या गाण्याच्या बाबतीत म्हणता येईल. मला स्वत:ला हे गाणं खूप आवडलं आहे. स्टार प्रवाहसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे बंध घट्ट झाले आहेत.
https://twitter.com/StarPravah/status/1103189104836177920