'कलरफुल'च्या निमित्ताने एकत्र झळकणार सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर, पोस्टर प्रदर्शित

By  
on  

लॉकडाऊननंतर अनलॉक झाल्यानंतर अनेक मराठी चित्रपटांची घोषणा होत आहे. यातच 'कलरफुल' हा सिनेमाही चर्चेत आहे. मात्र या सिनेमात कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात होतं. मात्र नुकतच या सिनेमातील कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकर या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

दिग्दर्शक प्रकाश कुंटे, हिंदी निर्माती मानसी आणि यंत्रा पिक्चर्सची निर्मिती या सिनेमाला लाभली आहे. नुकताच या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून या पोस्टरमध्ये सई आणि ललित हे दोघं पाहायला मिळत आहेत. या सिनेमात हे दोघं करण आणि मीराची भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने सई आणि ललित दोघं पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.

  'कलरफुल'च्या निमित्ताने एक रंगीबेरंगी लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे सिनेमातील या जोडीविषयी सांगतात की, 'ललित आणि सई हे दोघेही गुणी कलाकार आहेत, दोघांचं काम मी पाहिलं आणि अनुभवलं सुद्धा आहे, या सगळ्यात करण - मीरा हे दोघेच साकारू शकतील या बाबत मी ठाम होतो, सई आणि ललित या दोघांची पात्र जरी वेगळी असली तरी ती प्रेक्षकांना भावतील हा माझा विश्वास आहे."

या सिनेमाशिवाय सई आणि ललित हे 'मिडीयम स्पायसी' या सिनेमातही एकत्र झळकणार असल्याचं समोर आलं होतं. मात्र त्या सिनेमाविषयी कोणतीही घोषणा अद्याप झालेली नाही.

Recommended

Loading...
Share