By  
on  

महिला दिनाच्या मुहूर्तावर उलगडलं मुक्ता बर्वेच्या ‘बंदीशाळा’चं मोशन पोस्टर

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या सिनेमांची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. लवकरच ती एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. एका धडाकेबाज पोलिस अधिका-याच्या भूमिकेत ‘बंदीशाळा’ या आगामी सिनेमात पाहायला मिळतेय. या सिनेमाच्या कथानकाबाबत आणि इतर कलाकारांबाबत अद्याप काही उलगडलं नसलं तरी गुंडाशी दोन हात करणारी ही लेडी पोलिस ऑफीसर प्रेक्षकांना मात्र नक्कीच भावणार यात शंका नाही.

मुक्ता बर्वैच्या भूमिकांमध्ये नेहमीच विविध छटा आणि वैविध्य प्रेक्षकांना पाहायला मिळालंय, ‘बंदीशाळा’मधील हीसुध्दा एक आव्हानात्मकच भूमिकाच आहे. त्यामुळे सिनेमाबाबत कुतुहूल निर्माण झालं आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई 3'च्या जबरदस्त यशानंतर मुक्ताचा 'वेडिंगचा शिनमा' हा संगीतकार सलील कुलकर्णी दिग्दर्शित सिनेमा येतोय. तसंच नुकतीच विक्रम फडणवीसच्या 'स्माईल प्लीज' या मराठी सिनेमातसुध्दा मुक्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचं उलगडलं आहे.

https://www.instagram.com/p/BuusWliBE_B/

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive