By  
on  

पाहा Video : अभिनेत्री अमृता खानविलकरने पाडव्याला शेयर केला हा खास व्हिडीओ

मनोरंजन विश्वातील कलाकारही दिवाळी आणि पाडव्याचं सेलिब्रेशन करत आहेत. दिवाळीत अनेक कलाकार मंडळी घरातच असल्याने त्यांना परिवारासोबत दिवाळीचा आनंद लुटता येतोय. अभिनेत्री अमृता खानविलकरही तिच्या कुटुंबासोत दिवाळीचं सेलिब्रेशन करतेय.

पाडव्याच्या निमित्ताने अमृताने नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ अमृताच्या पाडव्याचा नसून तिच्या आई वडिलांच्या पाडव्याचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत अमृताची आई अमृताच्या वडिलांना ओवाळताना दिसतेय. शिवाय या व्हिडीओत एक छोटीशी गंमतही पाहायला मिळतेय.

 

अमृताने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. अमृतासह अनेक कलाकारांनी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अनेक पोस्ट केल्या आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive