By  
on  

अभिनेता स्वप्निल जोशी महिनाभर राहणार ट्विटरपासून दूर, हे आहे कारण..

अभिनेता स्वप्निल जोशी हा ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. ट्विटरवर स्वप्निल हा त्याच्या चाहत्यांसोबत संवाद साधतो. त्याच्या विविध प्रोजेक्ट्सविषयीच्या घोषणाही तो ट्विटरच्या माध्यमातून करताना दिसतो. स्वप्निलने नुकतीच आणखी एक घोषणा केली आहे. स्वप्निल हा महिनाभर ट्विटरपासून दूर जात असल्याचं त्यानं नुकत्याच केलेल्या ट्विटमधून सांगितलं आहे.

स्वप्निलने नुकतच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तो आउटडोअर शूटसाठी जात असल्याचं सांगतोय. म्हणूनच तो महिनाभर ट्विटरवर सक्रिय नसेल याविषयी चाहत्यांना सांगतोय.

स्वप्निल या ट्विटमध्ये लिहीतो की, "चला! आज पासून महिनाभर टीवटीव बंद! आउटडोअर शूटसाठी जातोय.. परत आल्यावर भेटूच !!! खूप प्रेम! थोड्या काळासाठी जात आहे. लवकरच परत येईन. प्रेम."

 

सध्या स्वप्निल समांतर या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाचं म्हणजेच समांतर -2 चं चित्रीकरण करतोय. तेव्हा याच सिरीजच्या चित्रीकरणासाठी स्वप्निल आउटडोअर चित्रीकरण करतोय की चाहत्यांसाठी काही वेगळं घेऊन येतोय याची देखील उत्सुकता आहे. तेव्हा महिन्याभरानंतर स्वप्निल पुन्हा ट्विटरवर सक्रिय होईल तेव्हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देईल का याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष असेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive