अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांचा लग्नसोहळा येत्या 30 नोव्हेंबरला पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचा साखरपुडा पार पडला होता. आता बेळगावात दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. सईने नुकतच तिच्या बॅचलरेट पार्टीची मजा लुटली आहे. आणि येत्या काही दिवसांत सईच्या लग्नाचे विविध सोहळे पार पडणार आहेत.
या लग्नसोहळ्याची खास आमंत्रण पत्रिकाही तयार करण्यात आली आहे. ही लग्नपत्रिका दुसरं तिसरं कुणी नसून स्वत: सईनेच बनवली आहे. ही एक डिटीजटल लग्नपत्रिका असून यात लग्नसोहळ्याच्या विविध कार्यक्रमांविषयी नमूद करण्यात आलय.
तेव्हा 27 नोव्हेंबर पासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता देवकार्य पार पडेल.
28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मेहेंदीचा कार्यक्रम पार पडेल. तेव्हा या मेहंदी सोहळ्यासाठी सईचा पेहराव काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यानंतर हळदी समारंभ पार पडेल. या हळदी समारंभासाठी खास ड्रेस कोड थीम असेल.
याच दिवशी म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजल्यानंतर सिमंत पूजा आणि सई-तिर्थदीपच्या लग्नाचा संगीत सोहळा पार पडेल.
आणि 30 नोव्हेंबर ज्या क्षणाची सईचे चाहते आणि स्वत: सई आणि तिर्थदीप वाट पाहत आहेत तो लग्नसोहळा पार पडणार आहे. सकाळी 9.54 वाजताचा या लग्नसोहळ्याचा मुहूर्त आहे.
याच दिवशी दुपारी 12 वाजता रिसेप्शन सोहळा आणि जेवणाचा कार्यक्रम असेल.
तेव्हा सई आणि तिर्थदीपच्या या लग्नसोहळ्यांच्या कार्यक्रमात दोघं काय परिधान करतील, कोण पाहुणे मंडळी या लग्नसोहळ्यात उपस्थित असतील, कसे पार पडतील या लग्नाचे हे विविध कार्यक्रम याकडेच सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. तेव्हा या गोड जोडीला या लग्नसोहळ्यासाठी पिपींगमूनकडून शुभेच्छा.