By  
on  

पाहा Video : या पेहरावात दिसल्या अभिनेत्री पूजा सावंतच्या ग्लॅमरस अदा

अभिनेत्री पूजा सावंत 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या डान्स कार्यक्रमातून पूजा परिक्षकाच्या खुर्चीत बसलेली दिसेल. विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी पूजा सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.

पूजाने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ शेयर केलाय. या व्हिडीओत पूजाच्या ग्लॅमरस अदा पाहायला मिळत आहेत. निळ्या रंगाच्या लेहंग्यात पूजा सुंदर दिसत आहे. नवी सुरुवात असं म्हणत पूजाने हा व्हिडीओ शेयर केला आहे.

 

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या डान्स कार्यक्रमातून पूजा नवी सुरुवात करत असल्याचं पाहायला मिळतय. सोशल मिडीयावर पूजा तिचे अनेक फोटोशूट पोस्ट करते. पूजाचे हे फोटो सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

Recommended

PeepingMoon Exclusive