दिवाळीत अनेकांनी फराळावर, मिठाईवर ताव मारला. यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. मात्र फराळ खाल्यानंतर आता फिटनेसकडे लक्ष दिलं जात आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बाबतीच तेच झालय. दिवाळी भाग्यश्रीने फराळावर चांगलाच ताव मारलेला दिसतोय. म्हणूनच तिने आता पुन्हा फिटनेसकडे लक्ष द्यायचं ठरवलय.
भाग्यश्रीने नुकतीच एक पोस्ट केली आहे. यात तिने स्वत:चे फोटो पोस्ट केले आहेत. दिवाळी सेलिब्रेशन आणि फराळानंतर आता फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी भाग्यश्रीने पुन्हा वर्कआउटला सुरुवात केली आहे. या पोस्टमध्ये तिने सुरुवातीला केलेल्या फिटनेस चॅलेंजचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र आता भाग्यश्री 21 दिवसांचं फिटनेस चॅलेंज करत आहे.
भाग्यश्री मराठी, हिंदीसह काही तेलुगू सिनेमांमध्येही झळकली आहे. भाग्यश्रीने मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. नुकतीच भाग्यश्री ही 'जय देवा श्री गणेशा' या मराठी मालिकेत झळकली होती. या मालिकेत भाग्यश्रीने देवी पार्वतीची भूमिका साकारली आहे.