By  
on  

पाहा Photos : बहिणीच्या केळवणाला अभिनेत्री स्पृहा जोशीचा मराठमोळा साज

अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या कविता, कवितांचे व्हिडीओ यासह विविध गोष्टी सोशल मिडीयावर शेयर करते. स्पृहाने नुकतेच काही खास क्षण शेयर केले आहेत. या पोस्टमध्ये स्पृहाने बहिणीच्या केळवणाचे फोटो शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये स्पृहा जोशीचा मराठमोळा साज पाहायला मिळतोय. साडी, नथ, चंद्रकोर अशा लुकमध्ये स्पृहा सुंदर दिसतेय. या फोटोंमध्ये स्पृहाचा बहिणीसोबतचा गोड फोटो आहे. शिवाय पति वरदसोबतचा फोटोही स्पृहाने पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये स्पृहाचे फॅमिली टाईम फोटो आहेत. सोशल मिडीयावर स्पृहाचा मोठा चाहतावर्ग आहे. या फोटोंनाही चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. यासह स्पृहा तिच्या युट्यूब चॅनेलवरही विविध कवितांचे वाचन म्हणजेच काव्यवाचन करताना दिसते. स्पृहाच्या युट्यूब चॅनेललाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive