श्रुती मराठे आणि गौरवच्या या फोटोने वेधलं सगळ्यांचं लक्ष

By  
on  

सोशल मिडीयावर अनेक सेलिब्रिटी कपल चर्चेत असतात. यात अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांचही नाव घेता येईल. या कपलचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत नसले तरी त्यांनी पोस्ट केलेला कपल फोटो चर्चेत येतो. नुकतच गौरवने असाच एक फोटो सोशल मिडीयावर शेयर केला आहे. गौरव - श्रुतीच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

 

गौरवने श्रुतीसोबतचा सेल्फि फोटो शेयर केला आहे. दोघांचा हा कपल फोटो अनेकांना आवडला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये गौरव लिहीतो की, "तर आज काय करायचं पार्टनर?"

2016 मध्ये श्रुती आणि गौरवने लगीनगाठ बांधली होती. तुझी माझी लव्हस्टोरी या सिनेमात दोघं एकत्र झळकले होते. या सिनेमाच्या निमित्ताने दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. त्यानंतर 4 डिसेंबर 2016 मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले. मराठी एन्टरटेन्मेंट विश्वातील हे गोड कपल मानलं जातं.

Recommended

Loading...
Share