अमृता खानविलकरचे बहिणीसोबतचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ? , बहिणीच्या वाढदिवसाला केली खास पोस्ट

By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकरने बहीण आदितीच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट केली आहे. अमृताने या पोस्टमध्ये बहिणीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये अमृताचे तिच्या बहिणीसोबतचे लहानपणीचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत.

एवढच नाही तर ती या पोस्टमध्ये लिहीते की, "माझी मुची... तू कायम माझी पहिली मुल आहेस आणि राहशील. तुझ्यासाठीच्या प्रेमाची कोणतीच सीमा नाही. मी तुला कधीच त्रासात पाहू शकत नाही. (निरु आणि नूरवी जन्माला आले ते सोडून) तू मला शिकवलस की तू कशी जगतेस आणि मला खरच चकीत केलस ज्या पद्धतीची आई तू बनली आहे. तू ज्या पद्धतिने कुटुंबाला सांभाळते ते मला आवडतं. मी आशा करते की मी हे एखाद्या दिवशी साध्य करू शकेन. तुझ्यासोबत सदैव असणं मी मिस करतेय. तुला खूप शुभेच्छा आणि काहीही असो मी सदैव तुझ्या पाठिशी उभी आहे."

अमृताची ही भावुक पोस्ट बहिणीला नक्कीच आवडली असणार यात शंका नाही. मात्र या पोस्टमधील तिच्या बहिणीसोबतचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत. 

Recommended

Loading...
Share