By  
on  

पाहा Photos : अभिनेता माधव देवचकेचा हा नवा लुक पाहिला का ?

सोशल मिडीयावर अनेक सेलिब्रिटींचे लुक चर्चेत असतात. यात मग काहींनी वेगळा लुक केला की त्याची चर्चा होते. सध्या अशीच चर्चा होत आहे अभिनेता माधव देवचकेची. याचं कारण आहे त्याचा नवा लुक.

अभिनेता माधव देवचके सध्या सोशल मिडीयावर त्याचे काही फोटो पोस्ट करताना दिसतो. या फोटोंमध्ये माधवचा हटके लुक पाहायला मिळतोय. या वेगळ्या लुकमध्ये माधव हँडसम दिसतोय. 

माधवच्या फोटोंना अनेक कमेंट्स आणि लाईक्स मिळत आहेत. या फोटोंमध्ये माधवचं ट्रान्सफॉरमेशनल झाल्याचं पाहायला मिळतय. त्याचे हे फोटो पाहून त्याच्या अनेक मित्रमंडळींनी या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.

माधव हा अनेक मराठी आणि हिंदी मालिका, सिनेमे, नाटकांमध्ये झळकला आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात माधवने स्पर्धक म्हणून लक्ष वेधलं होतं. 

सध्या सोशल मिडीयावर माधवच्या या नव्या फोटोंची चर्चा होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive