पाहा Video : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीच्या या अदा पाहिल्यात का ?

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील गौरी सगळ्यांचचं लक्ष वेधतेय. गौरीचा साधाभोळा स्वभाव हीच तिची ताकद या मालिकेत दाखवली आहे. मात्र ही गौरी खऱ्या आयुष्यातही एक उत्तम अदाकारा आहे. अभिनेत्री गिरीजा प्रभू गौरीची भूमिका साकारते. जी एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे.

गिरीजा सोशल मिडीयावर तिचे विविध व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. नुकताच गिरीजाने एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओत ती शुकरान अल्लाह या गाण्यावर अदाकारी दाखवताना दिसतेय. गौरी म्हणजेच गिरीजाचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडलाय.

 

गिरीजाने याआधी अनेक ब्युटी कॉन्टेस्ट जिंकल्या आहेत. या मालिकेच्या आधी डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये देखील गिरीजा स्पर्धक म्हणून दिसली होती. जिथे गिरीजाचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळाले होते. 

मात्र आता सेटवर ब्रेकटाईममध्ये मेकअपरुममध्ये छान व्हिडीओ करुन गिरीजा तिच्या नृत्याची हौस भागवतेय. 

Recommended

Loading...
Share