'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका पू्र्ण करणारच: डॉ.अमोल कोल्हे

By  
on  

छत्रपती शिवाजी महारांजांची भूमिका साकारुन आधी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आता 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकतायत. ऐतिहासिक भूमिकांमध्ये नेहमीच ते आपल्या अभिनयाची छाप पाडतात. पण त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड करणारी एक बातमी नुकतीच वा-यासारखी पसरली ती म्हणजे अमोल कोल्हे लवकरच या प्रसिध्द मालिकेला रामराम ठोकतायत. पण अमोल कोल्हे ह्यांनी मात्र ही निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी शिवबंधन तोडून हाती घड्याळ बांधलं. म्हणजेच शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अमोल कोल्हे यांनी केलेल्या या अचानक प्रवेशानंतर ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवली जात होती आणि याच कारणास्तव ते 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेला रामराम ठोकणार अशा बातम्या प्रसिध्दी माध्यमांमधून झळकू लागल्या. ह्या बातम्या फेटाळून लावत आता अमोल कोल्हे यांनी सोशल मिडीयाद्वारे याचं स्पष्टिकरण दिलं आहे.

https://www.facebook.com/Dr.AmolKolhe/photos/a.527057960644065/2611875422162298/?type=3

Recommended

Loading...
Share