झी मराठीवरील ग्रहण मालिकेमुळे घराघरांत पोहचलेले अभिनेते योगेश देशपांडे आता लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. '६६ सदाशिव' हा आगामी सिनेमा घेऊन ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मुळात चित्रकार असलेल्या योगेश यांनी रेडीओ, टीव्हीसाठी जाहिरात लेखन-दिग्दर्शन केले आहे. याशिवाय पु.लं, गदिमा यांच्यावरील कार्यक्रमासह विविध सांगीतिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे संहिता लेखन आणि सादरीकरण करत असताना त्यांनी अभिनयाची आवडही जपली आहे.
मोहन जोशी-वंदना गुप्ते - महेश मांजरेकर - प्रविण तरडे- अपूर्वा मोडक- आसावरी जोशी - जयंत सावरकर- विशाखा सुभेदार- विजय निकम- प्रणव रावराणे आणि योगेश देशपांडे यांचीसुध्दा सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
'६६ सदाशिव' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन अशी दोन्ही धुरा योगेश देशपांडे यांनीच सांभाळली आहे. निर्मिती ‘पुणे टॉकीज प्रा. लि.’ यांची असून हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर हे सिनेमाचे निर्माते आहेत.
https://www.facebook.com/yogesh.deshpande.752/posts/2111527708884106
https://www.instagram.com/p/BslMRU5BBtm/?utm_source=ig_embed