'आई कुठे काय करते' मधील संजनाचे हे फोटो पाहा

By  
on  

'आई कुठे काय करते' या मालिकेने कमी कालावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. एवढच नाही तर ही मालिका मराठी टेलिव्हीजन विश्वातील नंबर वन मालिका देखील बनली. या मालिकेला प्रेक्षकांचं भरपुर प्रेम आणि प्रतिसाद मिळतोय. मालिकेच्या नावापासून, संवाद, पात्रे आणि कलाकार सगळ्याच गोष्टी लक्षवेधी ठरत आहेत.

या मालिकेतील संजना हे पात्रही लक्षवेधी ठरलं. सुरुवातीला अभिनेत्री दिपाली पानसरे संजनाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर अभिनेत्री रुपाली भोसले आता संजनाची भूमिका साकारत आहे. रुपालीलाही संजनाच्या भूमिकेत प्रेक्षकांनी स्विकारलं. ती या मालिकेत दोघात तिसरी म्हणजेच अनिरुद्धची प्रेयसी असली तर तिला इतक्या नेगेटीव्ह शेड नाहीत. ती हळवी देखील आहे आणि अनिरुद्धवर प्रेम करणारी आहे. 

अभिनेत्री रुपाली भोसलेने संजनाची भूमिका उत्तररित्या साकारली आहे. संजनाच्या व्यक्तिरेखेतील ग्लॅमर तिला साजेसा वाटतो. रुपालीने नुकतेच संजनाच्या पेहरावातील काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. रुपालीच्या फोटोंवर कायमच तिच्या चाहत्यांच्या लाईक्सचा वर्षाव होत असतो. या फोटोंनाही हजारो लाईक्स मिळाले आहेत.

 

Recommended

Loading...
Share