"2020 संपणार..." म्हणत अभिनेता स्वप्निल जोशीने शेयर केला हा व्हिडीओ

By  
on  

2020 या वर्षाने संपूर्ण जगाला बरच काही दाखवलं. कोरोना सारखं मोठं संकट भारतावरच नाही तर संपूर्ण जगाला त्याला सामोरं जावं लागलं. याशिवाय 2020 या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यामुळे हे वर्ष कधी संपतय याची उत्सुकता सगळ्यांना आहे. 

अभिनेता स्वप्निल जोशी देखील आता 2021 या नव्या वर्षाची वाट पाहत आहे. यासाठी स्वप्निलने एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत तो म्हणतो की, "आज 1 डिसेंबर आहे. म्हणजेच 2020 संपायची आज अधिकृत सुरुवात झाली आहे. संपणार 2020 संपणार. शेवटचे 31 दिवस. "
तेव्हा या वर्षाचे शेवटचे 31 दिवस बाकी आहेत. हे वर्ष लवकरच संपणार असं म्हणत स्वप्निलने हा व्हिडीओ केला आहे. स्वप्निलच्या या व्हिडीओने अनेकांना दिलासा मिळाला असणार एवढं नक्की. 

 

तेव्हा 2021 हे वर्ष कसं असेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे. मात्र अभिनेता स्वप्निल जोशी या नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी काहीतरी खास घेऊन येतोय. या वर्षी 'समांतर या त्याच्या वेबसिरीजने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. स्वप्निलची ही पहिलीच वेबसिरीज चांगलीच गाजली. आणि आता नव्या वर्षात याच वेबसिरीजचं दुसरं सिझन घेऊन स्वप्निल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Recommended

Loading...
Share