छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी शरद केळकरने अशी दिली होती फर्स्ट लुक टेस्ट

By  
on  

'तान्हाजी' या सिनेमाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच होती पण त्यासोबतच रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. सिनेमातील अजय देवगणची तान्हाजीची भूमिका असेल किंवा इतर भूमिका, प्रत्येक भूमिका त्या त्या कलाकारांनी उत्तम रित्या साकारल्या होत्या. या सिनेमात अभिनेता शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराज साकारले होते. या भूमिकेसाठी शरदच्या अभिनयाचही कौतुक झालं होतं.

शरदला नुकतीच या सिनेमाची आठवण झाली आहे. एवढच नाही तर या सिनेमासाठी त्याने दिलेल्या पहिल्या लुक टेस्टची आठवण त्याने शेयर केली आहे. शरदने या भूमिकेसाठी दिलेल्या पहिल्या लुक टेस्टचा फोटो शेयर केला आहे. 

शरद या पोस्टमध्ये लिहीतो की, "महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अवतारात पहिल्यांदा येण्याचा अभिमान काही निराळाच होता."

 

या भूमिकेसाठी शरदने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पेहराव केला होता. त्या पेहरावात आल्यानंतरचा अनुभव त्याने या पोस्टच्या निमित्ताने शेयर केला आहे.

सध्या 'लक्ष्मी' या सिनेमातील शरद केळकरच्या भूमिकेचही कौतुक होत आहे. या सिनेमात शरदने लक्ष्मी या ट्रान्सजेंडर व्यक्तीचं पात्र साकारलं आहे. ज्याने सगळ्यांचच लक्ष वेधलं आहे. शरदने विविध मालिका आणि सिनेमांमधून सिनेविश्वात त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Recommended

Loading...
Share