हा मराठी अभिनेता सध्या शोधतोय काम, फेसबुकवर केली ही पोस्ट

By  
on  

कोरोनाग्रस्त काळात अनेक बेरोजगार झाले. सध्याच्या परिस्थितीतही अनेकांकडे कामं नाहीत. यात मनोरंजन विश्वही याला अपवाद नाही. अनेक कलाकारांकडे अजूनही कामं नाहीत. यातच एका मराठी अभिनेता सध्या तो कामाच्या शोधात असल्याचं सोशल मिडीयावर जाहीरपणे सांगीतलं आहे.

हा आहे प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळे. गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात असलेला हा अभिनेता सध्या काम शोधतोय. आस्तादने नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तो सध्या कोम शोधत असल्याचं सांगतोय. आस्तादने लिहीलय की, "नमस्कार. मी सध्या काम (अभिनय/सूत्रसंचालन) शोधतो आहे. माझ्या योग्य भूमिका असल्यास कृपया विचार करावा" 

 

आस्तादने ही पोस्ट करताच अनेकांनी त्याला या पोस्टवर कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी त्याच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये एका कमेंटमध्ये तर आस्तादसाठी वॉईसओव्हरची संधी देखील चालुन आली आहे. एक प्रसिद्ध अभिनेता असं मोकळेपणाने कामाविषयी पोस्ट करताना पाहुन अनेकांनी आस्तादचं कौतुक केलं आहे. आस्ताद हा नुकताच सिंगींग स्टार या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून पाहायला मिळाला. तिथे त्याने त्याचं गायनकौशल्य दाखवलं. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वातही अस्तादने चांगली खेळी खेळली. याशिवाय मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये आस्तादने वैविध्यपूर्ण कामं केली आहेत.

काही वर्षांपूर्वी बॉलिवुड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सोशल मिडीयावर अशीच पोस्ट केली होती. त्यांनीही काम शोधत असल्याचं सांगीतलं होतं. त्या पोस्टनंतर त्यांच्यावर कामाचा जणू वर्षाव झाला. आणि आता त्यांना उत्तमोत्तम काम मिळत आहे. 

Recommended

Loading...
Share