पतिच्या आत्महत्येच्या दु:खात असताना मयुरीला शीतल आमटे यांनी दिला होता धीर, मयुरीने शेयर केला व्हिडीओ

By  
on  

अभिनेत्री मयुरी देशमुख पतिच्या आत्महत्येच्या दु:खातून सावरतेय. त्यातच एका बातमीने ती सध्या अस्वस्थ झाली आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येच्या बातमीने दु:ख झाल्याचं मयुरी सांगते. मयुरीने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावना, नैराश्येविषयी बोलण्याचा संदेश मयुरी देत आहे. 

याशिवाय शीतल आमटे यांनी मयुरीच्या दु:खाच्या काळात तिला धीर दिला होता. मयुरी सांगते की, "काही आठवड्यांपूर्वी शितल ताई मला फेसबुकवर अप्रोच झाली होती. मला मेसेज केला होता. मला खूप धीर दिला होता. माझ्या धीराचं कौतुक केलं होतं. माझ्यासाठी ती खंबीरपणे उभी असल्याचं मला सांगीतलं होतं. हे सगळं आमची ओळख असताना तिनं केला. तिचा हा मोठेपणा मला खूप भावुन गेला होता. दुसरं म्हणजे काही महिन्यांपूर्वी मी त्यांचा व्हिडीओ पाहिला होता. त्यांच्या कलर थेरिपीचा व्हिडीओ मी आशुला देखील दाखवला होता."

 

काही महिन्यांपूर्वी मयुरीचा पति आशुतोष भाकरेनं नैराश्येमधून आत्महत्या केली होती. आणि त्याच दरम्यान शीतल आमटे यांनीदेखील तिला धीर दिल्याचं मयुरी या व्हिडीओत सांगते.

याशिवाय मयुरी सांगते की, "तुमची कुठलीही मानसीक अवस्था किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही कोणासोबतही शेयर करता आली पाहिजे. हे खूप जास्त गरजेचं आहे."

Recommended

Loading...
Share