By  
on  

अभिनेत्री मनवा नाईकच्या या गोष्टीला झाले एक वर्ष पूर्ण

अजरामर ठरलेलं विल्मय शेक्सपिअर लिखित 'हॅम्लेट' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणलं गेलं होतं. नाना जोगांनी मराठी रुपांतर केलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली होती. या नाटकात सुमीत राघवन, तुषार दळवी, भूषण प्रधान, सुनील तावडे, आशिष कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, मनवा नाईक, रणजीत जोग, मुग्धा गोडबोले या कलाकारांच्या भूमिका होत्या. 

याच नाटकाचा शेवटच्या प्रयोगाला नुकतीच एक वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनेत्री मनवा नाईकने याच नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मनवाने या नाटकात ओफेलियाची भूमिका साकारली होती. या नाटकाच्या प्रवासात मनवाने दीड वर्षे या भूमिकेसोबत घालवली होती. आणि मात्र आता हीच आठवण तिने शेयर केली आहे.

मनवाने नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "एक वर्ष झालं. 13 डिसेंबर 2019 ला मी ओफेलियाला शेवटची भेटले होते."

 

या पोस्टमध्ये मनवाने नाटकाच्या प्रयोगादरम्यानचे काही फोटो आणि तिच्या भूमिकेतील काही फोटो शेयर केले आहेत. या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगानंतरही मनवाने भावुक पोस्ट केली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive