By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला या दिवशी फियान्से कुणालने केलं होतं प्रपोज

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने यावर्षी ती प्रेमात असल्याची कबुली देत तिच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून तिच्या चाहत्यांना सरप्राईज दिलं. सोनालीने नुकतीच सोशल मिडीयावर एक खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये सोनालीने तिचा फियान्से कुणालसोबतचा थ्रोबॅक फोटो शेयर केला आहे. या पोस्टमध्ये सोनालीने प्रपोझल डेचा फोटो शेयर केला आहे. 1 डिसेंबर 2019 रोजी सोनाली - कुणाल यांचा प्रपोझल डे असल्याचं तिने या पोस्टच्या हॅशटॅगमध्ये सांगीतलं आहे. हा फोटो दुबईत क्लिक करण्यात आला आहे. 

सोनाली कुलकर्णी  आणि कुणाल बेनोडेकर यांचा याच वर्षी दुबईत साखरपुडा पार पडला. त्यानंतर आता दोघं विवाहबंधनात कधी अडकतील याच्या चर्चा रंगल्या. मात्र पुढल्या वर्षी 2021 मध्ये दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं सोनालीने अनेकदा सोशल मिडीयावर म्हटलं आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive