By  
on  

पाहा Photos : गायिका कार्तिकी गायकवाडच्या लग्नाला या खास पाहुण्यांनी लावली हजेरी

गायिका कार्तिकी गायकवाड ही रोनीत पिसेसोबत नुकतच लग्नबंधनात अडकली आहे. कार्तिकीच्या लग्नाचे विविध कार्यक्रम नुकतेच पार पडले. 

या लग्नसोहळ्यासाठी अनेक नामवंत पाहुण्यांनी हजेरी लावली होती. कार्तिकीच्या लग्नात प्रसिद्ध शास्त्रिय गायक राहुल देशपांडे, गायिका सावनी रविंद्र, गायक मगेंश बोरगांवकर, शमिका भिडे यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. 

नुकतच गायक मंगेश बोरगांवकरने कार्तिकीच्या लग्नातील काही खास क्षण सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

सोशल मिडीयावर कार्तिकीच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचे फोटो चांगलेच चर्चेत राहिले.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive