By  
on  

पाहा Video : 'डॉक्टर डॉन' आहे या प्रसिद्ध गायकाचा चाहता, गिटारवर वाजवलं हे गाणं

'डॉक्टर डॉन' या मालिकेतून अभिनेता देवदत्त नागे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या शूटींगदरम्यान ब्रेकटाईममध्ये देवदत्त त्याचे छंद जोपासताना दिसतोय. देवदत्त कधी गिटारवर त्याचं आवडतं गाणं वाजवतो तर कधी त्याच्या कोस्टारसोबत मस्ती करतो. देवदत्तने नुकताच एक असाच व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे.

देवदत्तला गिटार वाजवण्याची आवड आहे. अर्थात त्याला संगीताची आवड आहे. त्यातच गायक लकी अली त्याला प्रचंड आवडतो. आणि म्हणूनच लकी अलीचं प्रसिद्ध गाणं ओ सनम.. त्याने गिटारवर वाजवलं आहे. देवदत्त सोबत त्याचा सहकलाकार अजिंक्य दाते त्याला या गाण्यात साथ देताना दिसतोय. देवदत्तने हा बिहाइंड द सीन व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे.

 

देवदत्तच्या चाहत्यांनाही त्याचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. गायक लकी अलीसाठी देवदत्तने हा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये देवदत्त लिहीतो की, "तुमच्यावर प्रेम आहे लकी अली.. दीर्घ आयुष्य जगा."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive