By  
on  

अभिनेत्री मानसी साळवीचं बऱ्याच वर्षांनी मराठी टेलिव्हीजनवर पुनरागमन, नवी मालिका लवकरच..

सध्या विविध विषयांवर आधारित मालिका टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकांच्या गर्दीत आणखी एक वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  काय घडलं त्या रात्री ? असं या मालिकेचं नाव आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. एका अभिनेत्याच्या मृत्यूचं गुढ या मालिकेत लपलेलं पाहायला मिळतय. 

या मालिकेत अभिनेता सुशांत शेलार, स्मिता गोंदकर, स्वाती लिमये, किशोर कदम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एका मोठ्या स्टारच्या मृत्यूनंतर ती हत्या की आत्महत्या याचा शोध घेणारी एक महिला पोलीस अधिकारी यात आहेत. आणि याच पार्श्वभूमिवर ही मालिका आहे. अभिनेत्री मानसी साळवी या मालिकेत महिला पोलीस अधिकारीच्या भूमिकेत आहे. मानसीने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. आणि आता बऱ्याच वर्षांनी मानसी या मालिकेतून मराठी टेलिव्हीजनवर पुनरागमन करत आहे.

 

31 डिसेंबरपासून ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive