बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांचा नुकताच लग्नसोहळा पार पडला. लग्नाचे विविध कार्यक्रम बेळगावात पार पडले. मात्र त्यानंतर सई तिच्या सासरी कोलकातामध्ये आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीत हनीमूनसाठी देशाबाहेर न जाता सध्या सई आणि तिर्थदीप कोलकातामध्येच भटकंती करत आहेत.
सईने नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सईला लग्नानंतर जगातील सात आश्चर्य पाहण्याची इच्छा होती. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत हनीमूनला न जाता सध्या सई तिचा पति तिर्थदीप सोबत कोलकातामधील विविध ठिकाणं पाहत आहे. कोलकातामधील एको पार्कला सईने नुकतीच भेट दिली. जिथे जगातील सात आश्चर्यांच्या छोट्या प्रतिकृती आहेत. यावेळी सईने व्हिडीओही शूट केला. तिर्थदीपसोबत या ठिकाणी सईने चांगलीच मजा लुटली.
30 नोव्हेंबर रोजी सई आणि तिर्थदीपने लगीनगाठ बांधली. याआधी काही दिवस मेहंदी, संगीत, हळदी असे विविध लग्नाचे कार्यक्रम दिमाखात पार पडले होते. सोशल मिडीयावर सध्या या नवविवाहीत जोडप्याची चांगलीच चर्चा आहे.