By  
on  

पाहा Video : पुन्हा 'सही रे सही'ची धूम, भरत जाधव यांनी शेयर केला व्हिडीओ

एकीकडे सिनेमागृहे सुरु झाल्यानंतर नाट्यगृहेही सुरु झाली आहेत. आणि आता नाटकांच्या प्रयोगांना सुरुवात झाली आहे. 12 डिसेंबर रोज एका लग्नाची पुढची गोष्ट या प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या नाटकाने नाट्यसृष्टीची पुन्हा सुरुवात झाली. आणि आता भरत जाधव यांचं प्रसिद्ध सातासमुद्रापारही गाजलेलं नाटक 'सही रे सही' चे प्रयोग नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

भरत जाधव यांनी या निमित्ताने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत ते या नाटकातील भूमिकेची झलक दाखवताना दिसत आहेत. 19 डिसेंबरपासून पुण्यातील बालगंधर्व रंगमदिर येथील प्रयोगाने या नाटकाला पुन्हा सुरुवात होणार आहे. ज्या नाटकावर नाट्यरसिकांनी आजवर इतकं प्रेम केलं आणि भरभरुन प्रतिसाद दिला ते नाटक आता पुन्हा भेटीला आलं आहे. तर दुसरीकडे भरत जाधव यांच्या केदार शिंदे दिग्दर्शित 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेलाही पसंत केलं जातय.

कोरोनाग्रस्त परिस्थितीत बंद झालेली नाट्यसृष्टी आता पुन्हा सुरु झाली आहे. तेव्हा नाट्यरसिकही या नाटकांचा मनसोक्त आनंद लुटतील यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive