अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण, त्यांच्या मुंबईतील नाटकाचे पुढील प्रयोग रद्द

By  
on  

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशांत दामले यांची कोव्हिडची चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या नाटकाचे मुंबईतील रिओपनिंगचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

लॉकडाउननंतर प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग 12 डिसेंबर रोजी चिंचवडमध्ये पार पडला. त्यानंतर मुंबईत आल्यावर दामले यांना कणकण जाणवत होती. मात्र कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे आता प्रशांत दामले सात दिवस आयसोलेशनमध्ये राहत आहेत. 

 

त्यांच्या नाटकाचे रिओपनिंगचे प्रयोग मुंबईत होणार होते. मात्र ते प्रयोग आता रद्द करण्यात आले आहेत. नुकतच प्रशांत दामले यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेयर करून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. ते म्हणतात की, "मागच्या रविवारी चिंचवडचा प्रयोग झाला तेव्हा थोडीशी कणकण वाटत होती तेव्हा कोरोनाची टेस्ट करून घेतली. मी काठावर पास झालोय. शाळेपासूनच मी काठावर पास झालोय. सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये जावं लागेलं. माझे पुढचे दोन्ही प्रयोग करता येणार नाहीत. माझे सगळे को आर्टिस्ट ठणठणीत आहेत. काठावरचा जरा मी मागे येतो आणि काळजी घेतो."

Recommended

Loading...
Share