अभिनेत्री मानसी नाईकने यावर्षी तिच्या वाढदिवसाला तिच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं. मानसीने सोशल मिडीयावर प्रेमाची कबुली दिली. प्रदीप खरेरासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने सगळ्यांना सांगितलं. सोशल मिडीयावर या कपलची जोरदार चर्चा रंगली. मानसी-प्रदीपचे व्हिडीओ, त्यांचे एकत्र फोटो चर्चेत येऊ लागले.
नोव्हेंबर महिन्यात दोघांनी साखरपुडा देखील केला आहे. मात्र आता मानसीच्या चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता असणार यात शंका नाही. मात्र मानसीने याविषयी देखील एक खास पोस्ट केली आहे. मानसीने प्रदीपसोबतचा एक फोटो सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या पोस्टमध्ये मानसी वधू बनण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगते. शिवाय मानसीने लग्नाच्या काउंट डाउनला सुरुवात केली आहे. मानसी आणि प्रदीपच्या लग्नाचं काउंट डाउन सुरु झालेलं आहे. तेव्हा लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. मानसीने लग्नाची तारीख मात्र अजून सांगितलेली नाही. तेव्हा या लग्नाकडे अनेकांचं लक्ष असेल यात शंका नाही.
मानसी ही अभिनेत्री आणि एक उत्तम नृत्यांगना आहे. तर प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. आणि ही मेड फॉर इच अदर जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.