अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेस्टर्नसह पारंपारिक वेशभुषेतही तितकीच सुंदर दिसते. सोनालीचे अनेक साडी लुक फोटोही सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. यातच साडी डेच्या निमित्ताने सोनालीने सोशल मिडीयावर काही खास फोटो शेयर केले आहेत.
निळ्या रंगाची साडी आणि निळ्या रंगाचा ब्लाउज असा सोनालीचा सुंदर लुक यात पाहायला मिळतोय.
वर्ल्ड साडी डेच्या निमित्ताने सोनालीने हे खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले होते.
सोनाली या पोस्टमध्ये लिहीते की, "'लिंबू कलरची साडी' ते 'माहरेची साडी'पर्यंत प्रत्येक भारतीय स्त्रीचं सौंदर्य खुलावणाऱ्या ४.५ यार्डच्या त्या पेहरावाचा आजचा दिवस. साडी आवडणाऱ्या व आयुष्यातल्या खास क्षणी साडीला प्राधान्य देणाऱ्या प्रत्येकीला शुभेच्छा."
सोनालीने या फोटोंसह या साडी लुकमध्ये एक सुंदर व्हिडीओही केला आहे. या फोटो आणि व्हिडीओला सोशल मिडीयावर हजारो लाईक्स मिळाले आहेत.