"लहानपण देगा देवा" संत तुकारामांच्या या ओळी आठवल्या की बालपणात हरवून जावंसं वाटतं आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटत. या ओळी अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या बाबतीत खऱ्या ठरल्या आहेत. सोशल मिडीयावर अनेक कलाकार चाहत्यांसोबत त्यांच्या बऱ्याच गोष्टी शेयर करत असतात. कधी एखादा फोटो पोस्ट करून तर कधी एखादा व्हिडीओ पोस्ट करून सेलिब्रिटीज विविध गोष्टी पोस्ट करतात. यातच अभिनेत्री ऋता दुर्गुळेने एक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेयर केली आहे.
ऋता दुर्गुळेला एक व्यक्तिची प्रचंड आठवण येत आहे. आणि ती व्यक्ति दुसरी तिसरी कुणी नसून बालपणीची ऋता आहे. ऋता तिचं बालपण प्रचंड मिस करतेय. म्हणूनच तिने तिच्या लहानपणीच्या फोटोसोबतचा फोटो शेयर केला आहे. ऋता ही लहानपणी क्राय बेबी म्हणजेच रडूबाई होती हे देखील ती या पोस्टमध्ये सांगते.
ऋता तिच्या पोस्टमध्ये लिहीते की, "ओके मी तिला मिस करतेय. लहानपणीच्या आठवणी, घरी परतण्याची वाट पाहु नाही शकत"ऋता लवकरच तिच्या घरी परतण्याची देखील वाट पाहतेय.