By  
on  

पाहा Video : मुलगी आणि पत्नीसोबत पुष्कर जोग असा साजरा करतोय ख्रिसमस

देशासह जगभरात आज ख्रिसमसचा म्हणजेचा नाताळ सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. सोशल मिडीयावर तर ख्रिसमस ट्रीच्या पोस्ट आणि सेलिब्रेशनचे फोटो पाहायला मिळत आहेत. यातच मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या उत्साहात नाताळ साजरा करताना दिसत आहेत. आपल्या कुटुंबासोबत, मित्रपरिवारासह ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जात आहे. 

अभिनेता आणि बिग बॉस फेम पुष्कर जोगही ख्रिसमस साजरा करतोय. पुष्करची मुलगी फेलिशाला ख्रिसमस सण प्रचंड आवडतो, म्हणजे कोणत्या लहान मुलांना ख्रिसमस आवडणार नाही. म्हणूनच पत्नी जास्मिन आणि मुलगी फेलिशासोबत पुष्कर ख्रिसमस साजरी करतोय. 

 

यासाठी खास ख्रिसमस ट्री सजवण्यात आली, लाल रंगाचे कपडे घालण्यात आले आणि फेलिशासाठी खास पांढऱ्या रंगाचा ड्रेस, असं सेलिब्रेशन करण्यात आलं. फेलिशासोबत जास्मिन आणि पुष्करने डान्स करून खास व्हिडीओ केला आहे. पुष्करने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive