शशांक केतकरने ख्रिसमसला दिली गुड न्यूज, लवकरच होणार बाबा

By  
on  

नाताळ सणाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत. कुणी ख्रिसमस ट्री चे फोटो पोस्ट करत आहेत कुणी ख्रिसमस सेलिब्रेशनचे. मात्र अभिनेता शशांक केतकरने सगळ्यांनाच एक गुड न्यूज दिली आहे. शशांकने पत्नी प्रियांकासोबतचा फोटो शेयर करत ही गोड बातमी शेयर केली.

शशांकची पत्नी प्रियांका प्रेग्नेंट असल्याची ही बातमी आहे. आणि शशांक लवकरच बाबा होणार असल्याचं त्याने या पोस्टमधून सांगितलं आहे. 

 

शशांक या पोस्टमध्ये लिहीतो की, "आम्हाला हे नेहमी माहिती होतं की सांता क्लॉज येतो आणि आपल्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो. आम्हाला हे माहिती नव्हतं की आम्ही इतके आभारी असू की खरोखर एक भेटवस्तू मिळेल. आम्हा तिघांकडून या सुट्टीच्या सिझनच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा"

तेव्हा लवकरच तिसरा पाहुणा किंवा पाहुणी शशांक-प्रियांकाच्या आयुष्यात येणार आहे. या गोड भेटवस्तूसाठी त्यांनी आधीच सांता क्लॉजचे आभार देखील मानले आहेत. शशांक आणि प्रियांकाला यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Recommended

Loading...
Share