By  
on  

अभिनेत्री रुपाली भोसलेवर शुभेच्छांचा वर्षाव, बॉयफ्रेंड आणि कोस्टार्स कडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'आई कुठे काय करते' या मालिकेत रुपाली संजना ही व्यक्तिरेखा साकारतेय. या भूमिकेसाठी रुपालीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. यातच आता वाढदिवसानिमित्ताने रुपालीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसह रुपालीला अनेकांनी सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रुपालीचा बॉयफ्रेंड अंकित मगारेनेही खास व्हिडीओ पोस्ट करुन रुपालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात रुपाली स्पर्धक म्हणून होती. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर रुपाली आणि अंकित यांचं अफेअर चर्चेत आलं होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ANKIT MAGARE (@magareankit)

 

'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री दिपाली पानसरे संजनाच्या भूमिकेत दिसत होती. त्यानंतर काही कारणास्तव दिपालीने ही मालिका सोडली. त्यानंतर रुपाली संजनाच्या भूमिकेत झळकू लागली. संजनाच्या भूमिकेत प्रेक्षकांना रुपालीला पसंतीची पावती दिली. याच मालिकेच्या कलाकारांनीही रुपालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या मालिकेत आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने खास फोटो पोस्ट करून रुपालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive