अभिनेत्री स्मिता गोंदकर पारंपारिक किंवा वेस्टर्न लुकमध्येही सुंदर दिसते. स्मिताने नुकतेच काही मराठी ट्रेडिशनल लुक फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये स्मिताच्या सुंदर अदा पाहायला मिळत आहेत.पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या या आउटफिटमध्ये नथ घालुन स्मिताने साज केला आहे.
सोशल मिडीयावरही हे फोटो पसंत केले जात आहेत.
नव्या वर्षाला सुरुवात होण्याआधीच स्मिताच्या हाती दोन नवे प्रोजेक्ट्स आले आहेत.
'काय घडलं त्या रात्री' या मालिकेत स्मिता महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर दुसरीकडे 'कॉमेडी बिमेडी' या विनोदी कार्यक्रमात स्मिता सुत्रसंचालकाची धुरा सांभाळत आहे.