By  
on  

या दिवसापासून नवी मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' करेल प्रेक्षकांचं मनोरंजन

लग्नानंतर अनेक नवी नाती तयार होतात. माहेर सोडल्यानंतर मुलगी एका नव्या कुटुंबात प्रवेश करते. आणि या प्रवासात जर सासू तिची सखी झाली तर या नात्यात आणखी गोडवा वाढतो. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  'येऊ कशी तशी मी नांदायला' असं या मालिकेचं नाव आहे.


ही गोष्ट आहे शकु आणि स्वीटू या दोघांची. नात्यानं या तर दोघी सासू सून आहेत पण मनाने मैत्रीच्या धाग्याने घट्ट बांधल्या गेल्या आहेत. यात मिश्किल सासू आणि खट्याळ सून असं हे नातं आहे. आणि या नात्याने घरात वेगळीच गंमत आणली आहे.  

या मालिकेत अभिनेत्री अन्विता फलटणकर, शाल्व किंजवडेकर आणि शुभांगी गोखले हे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत आहेत. याशिवाय आदिती सारंगधर, दीप्ती केतकर हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या मालिकेचे प्रोमो पाहिल्यानंतर अनेकांना या मालिकेची उत्सुकता लागली होती. तेव्हा नव्या वर्षात ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 4 जानेवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive