चंद्रभागा प्रोडक्शन प्रस्तुत जीवन जाधव आणि जितेश मोरे निर्मित प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलोच ‘ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पानिपतच्या लढाई नंतरचं सत्य ह्या चित्रपटातून दाखवण्यात येणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. दिग्दर्शक प्रकाश पवार यांचा दिग्दर्शक म्हणून हा तिसरा चित्रपट असून यापूर्वी रांजण आणि मिथुन या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते.
या चित्रपटाची अजून एक खास बात म्हणजे अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे प्रथमच एकत्र अभिनय करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर विशाल निकम, रोहित आवाळे हे नव्या दमाचे कलाकारसुद्धा ह्या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत.
"बलोच" ह्या चित्रपटाचे शूटिंग जून महिन्यात राजस्थान भागात सुरू होणार आहे .मराठ्यांच्या इतिहासातील मोठी जखम म्हणजे पानिपतचा पराभव, त्या पराभवानंतर आपल्या मावळ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरीत राहावे लागले .त्या गुलामांची शौर्यगाथा म्हणजे ‘बलोच’ सिनेमा अस दिग्दर्शकांनी सांगितले आहे