पाहा Photos : शनाया फेम रसिका सुनीलचा सुपर फिटनेस, शेयर केले हे फोटो

By  
on  

फिटनेस ही आवड आता ट्रेंड बनली आहे. तेव्हा यावर्षीही फिटनेसचा ट्रेंड अनेकांनी फॉलो केला आहे. यात सेलिब्रिटीज स्वत:च्या फिटनेसची योग्य ती काळजी घेताना दिसतात. स्क्रिनवर परफेक्ट दिसण्यासाठी वर्कआउट, योगा, डाएट याच्यावर प्रचंड मेहनत घेत असतात. अभिनेत्री रसिका सुनीलनेही स्वत:ला चांगलच फिट केलं आहे. 

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनाया या व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध असलेली रसिका तिच्या फिटनेसकडे चांगलच लक्ष देत आहे. रसिकाने नुकतेच तिचे फिट लुक फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

मागील वर्षी रसिकाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेऊन अभिनय, फिल्ममेकिंगच शिक्षण गेण्यासाठी ती परदेशात गेली होती. यावेळी तिला फिटनेसची आवड निर्माण झाल्याचं रसिकाने अनेक मुलाखतीत सांगितलं आहे. आणि आता हाच फिटनेस राखुन ठेवण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेतेय. 

रसिकाचे या फोटोंमधील फिट लुक पाहुन यामागची तिची मेहनत दिसतेय. सोशल मिडीयावर रसिकाचा हा फिट लुक चर्चेत आला आहे. 

Recommended

Loading...
Share