By  
on  

रुपाली भोसलेने वाढदिवसाला स्वत:ला दिली ही खास भेटवस्तू

अभिनेत्री रुपाली भोसलेच्या वाढदिवसानिमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोशल मिडीयावरही चाहत्यांनी रुपालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र हा वाढदिवस आणखी खास करण्यासाठी रुपालीने स्वत:लाही एक खास गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट आहे एक नवीन लॅविश कार. 

रुपालीने सोशल मिडीयावर तिच्या नव्या कारचे फोटो शेयर केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या या नव्या कारसोबत रुपालीने पांढऱ्या रंगाचं आउटफिट परिधान केलं आहे. 

रुपाली या पोस्टमध्ये लिहीते की, "आणि ती इथे आहे.. एक सुंदर स्वागत. ती फक्त चार चाकी आणि इंजिन नाही तर ती घर आहे. ही डुग्गू मी स्वत:ला वाढदिवसाला गिफ्ट केली आहे. स्वागत आहे माझी बेबी. माझ्या कारलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा."

तेव्हा वाढदिवसाला रुपालीने तिच्या नव्या गाडीचं स्वागत केलं आहे. या नव्या कारने रुपालीच्या वाढदिवसाचा आनंद आणखी द्विगुणीत झाला असेल यात शंका नाही.

 

'आई कुठे काय करते' या मालिकेत रुपाली संजनाच्या भूमिकेत झळकतेय. याआधी रुपाली मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात दिसली होती. याशिवाय रुपालीने हिंदी मालिकाही केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive