पाहा Video : इंडियन आयडलच्या मंचावर सुबोध भावे झाला भावुक

By  
on  

प्रसिद्ध सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडलच्या मंचावर नुकतीच अभिनेता सुबोध भावेने हजेरी लावली होती. यावेळी स्पर्धकांनी सुबोधच्या सिनेमांची गाणी सादर केली. मंचावर एक वेगळच वातावरण पाहायला मिळालं. सुबोध भावेच्या 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमातील गाणं मंचावर सादर करण्यात आलं. स्पर्धक नचिकेत लेले आणि अंजली गायकवाड यांनी सुरत पिया की हे गाणं इंडियन आयडलच्या मंचावर सादर केलं. 

 

हे गाणं ऐकून परिक्षकही थक्क झाले. परिक्षक हिमेश रेशमियानेही नचिकेत आणि अंजलीचं कौतुक केलं. मात्र हे गाणं सादर होत असताना सुबोध भावेच्या डोळ्यात पाणी होतं. सुबोध यावेळी भावुक झाला होता. यावेळी सुबोध म्हटला की, "कधी कधी आपण टाळ्या वाजावणं विसरतो. पण डोळ्यातून पाणी येतं तेव्हा ती टाळ्यांपेक्षाही मोठी दाद असते."

नुकताच या खास भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

Recommended

Loading...
Share